English SiteMapपुष्पाताई म्हणजे विविध कलागुणानी नटलेली चतुरस्त्र, बहुश्रुत चमकनारी हिर्कानी आहे, असे म्हटले तरी चालेल. ही हिरकणी हैदराबादच्या लेले घराण्यातील असून टी चमकली मात्र पुण्याच्या रानडे घरात येउनच. यांना एक ख्यातनाम कीर्तनकार म्हणून ओळखले जातात. आपण ३५ वर्षे त्यांची आकाशवाणीवरून कीर्तने ऐकत आहोत. टीव्ही वर आतापर्यंत त्यांची १८ कीर्तने झाली आहेत. गेली तीस वर्षे त्या स्वत:च्या घरी अर्चना भक्ती मंडळ चालवत आहेत.
त्यांना मिळालेल्या पुरस्कार हे त्यांच्या गुणवत्तेची पावतीच आहे.
1] गोवा कला अकादमी तर्फे त्यांना "कीर्तन संजीवनी" हा पुरस्कार
2] पुणे महानगर पालिके तर्फे जेष्ठ कीर्तनकार म्हणून पुरस्कार.
3] अखिल भारतीय कीर्तन संमेलनात जगद्गुरू शंकराचार्य च्या हस्ते कोल्हापुरात आदर्श कीर्तनकार आशीर्वादात्मक गौरव.
4] इंदूर च्या विद्वानजन संस्थे तर्फे गौरव.
5] अखिल भारतीय कीर्तन कुल, ठाणे-डोंबिवली शाखेतर्फे पुरस्कार व सत्कार.
6] प्र.के.अत्रे प्रतिष्ठान तर्फे कीर्तन माध्यमातून सतत ४० वर्षे समाज प्रबोधन केल्या बद्दल सन २००४ चा सुधा अत्रे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.